Home Breaking News आनंदनिकेतन महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

आनंदनिकेतन महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

270

प्रतिनिधी संकेत कायरकर वरोरा

आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन, वरोरा येथे ‘Research & Thesis Writing (Literature Review to Publication) ‘संशोधन व प्रबंध लेखन’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय कार्यशाळा मंगळवार,१३ जानेवारी २०२६ रोजी ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा आनंद निकेतन महाविद्यालयातील इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंग अँड स्पेशलाइजड स्टडीज (ILHR&SS),आंतरिक गुणवत्ता हमी कक्ष (IQAC)यांच्या पुढाकाराने व गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली यांच्या सहकार्याने पार पडली.
प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.अशोक मिस्त्री,अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा,गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयातील इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंग अँड स्पेशलाइजड स्टडीज चे समन्वयक डॉ.शौकत शहा समन्वयक आणि आय क्यू ए सी चे समन्वयक डॉ. निलेश उगेमुगे उपस्थित होते.या उद्घाटन सत्रात प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांनी या कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.
या कार्यशाळेतील पहिल्या सत्रात डॉ.संयोगिता वर्मा यांनी रिव्ह्यू ऑफ लिटरेचर यावर मार्गदर्शन केले.
दुसरे सत्र डेटा संकलन व विश्लेषण या विषयावर झाले.या सत्रात डॉ. प्रशांत वाघ यांनी मार्गदर्शन केले. तिसरे सत्र संशोधन लेखप्रकाशन या विषयावर डॉ. निलेश उगेमुगे यांनी घेतले.प्रबंध सादरीकरण प्रक्रिया व सांख्यिकी विश्लेषण या विषयावर प्रदीप माकडे यांनी चौथ्या सत्रात मार्गदर्शन केले,पाचवे सत्र संशोधनासाठी उपयुक्त एआय साधने या विषयावर प्रा.तिलक ढोबळे यांनी भाष्य केले.
या कार्यशाळेस सहभागी झालेल्या सर्वांनी या कार्यक्रमाबद्दल अतिशय समाधानकारक अभिप्राय नोंदविला हे महत्वाचे.या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व सत्रे ठरलेल्या वेळेनुसार व नियोजना नुसार पार पडली.आयोजन व महाविद्यालयाच्या शिस्तबद्ध नियोजनाचे सहभागी सर्वांनी केले.. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी सहभागी सर्वांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यशाळेत विविध विद्याशाखांतील प्राध्यापक, पीएच.डी. संशोधक व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला हे या कार्यशाळेचे यश ठरले.

Don`t copy text!