Home Breaking News चामोर्शी तालुक्यातील घरकुलधारकांना तालुका प्रशासनाने रेतीची उपलब्धता करून द्यावी – राष्ट्रीय मानवाधिकार...

चामोर्शी तालुक्यातील घरकुलधारकांना तालुका प्रशासनाने रेतीची उपलब्धता करून द्यावी – राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली

199

चामोर्शी तालुक्यातील घरकुलधारकांना तालुका प्रशासनाने रेतीची उपलब्धता करून द्यावी – राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली

जिल्हा प्रतिनिधी सतीश कुसराम

दिनांक 12 जानेवारी 2026 चामोर्शी तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी रेतीघाट उपलब्ध आहेत परंतु काही प्रशासकीय आवश्यक कार्यवाही न केल्याने सर्वसामान्य गोरगरीब घरकुलधारकांना रेती मिळण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण होत आहे रेती उपलब्ध न झाल्याने अनेक घरकुल अपूर्ण आहेत या विषयाची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार संघटन असोसिएशन नई दिल्ली
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ प्रणय भाऊ खुणे यांच्या मार्गदर्शनात
जिल्हा गडचिरोलीच्या मां, स, चे वतीने आज तहसील कार्यालय चामोर्शी येथे निकतवाडा येथील महिला घरकुल धारकांच्या उपस्थितीत, तहसीलदार घोरुडे साहेब, यांना निवेदन देण्यात आले,पंचायत समिती येथे संवर्ग विकास अधिकारी पोळ साहेब यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर चर्चा करण्यात आले, प्रभारी संवर्ग विकास अधिकारी यांना पंचायत समिती येथे निवेदन देण्यात आले यावेळी (गुंडापल्ली )सुभाषग्राम वन जमिनीच्या प्रश्नाबाबत सुद्धा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सुद्धा भेट देण्यात आली व तिथे सुद्धा उपविभागीय अधिकारी अरुण एम.यांच्या सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली व प्रशासनाच्या वतीने चामोशी तालुक्यातील समस्त घरकुलधारकांना रेती उपलब्ध करून देण्यात येईल व ग्रामपंचायत निहाय रेती घाट उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रशासनाने वतीने आश्वासन देण्यात आले यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन महिला आघाडी नेत्या अणिता रॉय, राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये,तालुका सचिव दिनेश मुजुमदार संतोष बुरांडे विलास वडेट्टीवार व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!