Home Breaking News 500 कोटीच्या अमृत योजनेतून 100 कोटी खाणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता देऊ नका;विजय...

500 कोटीच्या अमृत योजनेतून 100 कोटी खाणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता देऊ नका;विजय वडेट्टीवार

187

500 कोटीच्या अमृत योजनेतून 100 कोटी खाणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता देऊ नका; आरोग्य, शिक्षण आणि शहराच्या मूलभूत दर्जेदार सुविधांसाठी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांने विजयी करा.

जिल्हा प्रतिनिधी गौरव मोहबे

चंद्रपूर शहरातील प्रभाग क्रमांक – 7 जटपुरा मधील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार आश्विनी खोबरागडे, मिनाक्षी गुजरकर, मनोज वासेकर आणि इंजी रमिज शेख यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा पंचशील नगर येथे मोठ्या संख्येने, उत्साहात पार पडली.

कोट्यावधींचा विकास निधी आणला असा खोटा प्रचार करून भाजप जनतेची दिशाभूल करत आहे. खरंतर चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कमिशन खोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला आहे, म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत या कमिशनखोरांना सत्तेतून बेदखल करा.

राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली याला सर्वस्वी जबाबदार असलेल्या भाजपला मतदान मागायचा अधिकार नाही. आज संपूर्ण देशात व राज्यात महागाई व बेरोजगारीमुळे जनता त्रस्त झाली असून सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. काँग्रेस काळामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय, हक्क आणि त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यात येत होती. मात्र भाजपने अमृत नळ योजना व भूमिकत गटार योजनेतून कमिशन खोरी केल्याने आज जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी सुद्धा मिळत नाही. शहरातले अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा व सर्वसामान्य नागरिकांचे हाल याला सर्वस्वी जबाबदार फक्त भाजप आहे.

काँग्रेस पक्षाने चंद्रपूर शहराच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेसचे सर्व उमेदवार हे कटिबद्ध असतील असा शब्द देतो. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन करतो.

Don`t copy text!