Home Breaking News आरोग्य व शैक्षणिक क्रांतीसह चंद्रपूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी काँग्रेसला सत्ता द्या;...

आरोग्य व शैक्षणिक क्रांतीसह चंद्रपूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी काँग्रेसला सत्ता द्या; बंगाली कॅम्प, प्रभाग -4 मध्ये जाहीर सभा…

147

संपादक प्रशांत बिट्टूरवार

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगाली कॅम्प प्रभागातील शांतीनगर येथे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार साधना रामटेके, संगीता भोयर, बिंदिया अधिकारी, अमजद अली यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा संपन्न झाली.

या महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शहराला विकास नव्हे तर भ्रष्टाचारातून जनतेच्या नशिबी हाल, अपेष्टा दिल्या आहे, यांचे हे पाप आता जनता माफ करणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेवर बसलेले लोक केवळ सत्ता उपभोगत राहिले, बंगाली कॅम्प, शांतीनगरसारख्या भागांत मूलभूत सुविधा मिळण्यासाठी नागरिकांना आजही संघर्ष करावा लागतो, हे तत्कालीन भाजप सत्ताधाऱ्यांचे अपयश नाही तर काय आहे.

रस्ते, पाणी, उघड्या नाल्या, आरोग्य व स्वच्छतेच्या प्रश्नांवर भाजप सत्ताधाऱ्यांनी पाठ फिरवली असून, मागील काळात भाजप सत्ताधाऱ्यांनी 2000 कोटींची विकासकामे केल्याचा कांगावा सुरू केला असला तरी यातून कोणाचा विकास झाला याचा हिशोब यांनी चंद्रपूरकरांना दिला पाहिजे. ५०० कोटींची अमृत योजना तसेच कोट्यावधींची भूमिगत गटार योजनेत प्रचंड भ्रष्टाचार करणारे आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा खोटी आश्वासने देत आहे, यांच्या भूलथापांना आता जनता बळी पडणार नाही.

महानगरपालिका म्हणजे कंत्राटदारांची कुरघोडी नव्हे, तर सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण करणारी संस्था असली पाहिजे. काँग्रेसचे सर्व उमेदवार हे जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे सैनिक आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आल्यास शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून महानगरपालिकेचे स्वयंभू सर्व सोयी सुविधा असलेले रुग्णालय कार्यान्वित करून उत्तम दर्जाची आरोग्यसेवा प्रदान केल्या जाईल. तसेच शहरातील गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता नवे धोरण आखून इंग्रजी माध्यमांच्या मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा देखील सुरू करण्यात येईल असा शब्द तुम्हाला देतो.

या सभेस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक बांगडे, प्रवीण पडवेकर, प्रमोद बोरीकर यांचेसह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!