चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी आमदार डॉ. देवराव होळी व आमदार किशोर जोरगेवार यांची घरोघरी भेट
संपादक प्रशांत बिट्टूरवार
चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराला वेग दिला असून MEL प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार जितेश कुळमेथे, आशा देशमुख, नितेश गवळी व सविता सरकार यांच्या समर्थनार्थ भाजप नेत्यांनी जोरदार प्रचार केला.
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी कृष्णनगर व संजयनगर परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
प्रचारादरम्यान माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सांगितले की, महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता आणणे ही काळाची गरज असून प्रभागातील मूलभूत समस्या सोडविण्याची क्षमता फक्त भाजप उमेदवारांमध्ये आहे. विकासाभिमुख विचारसरणी, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या प्रश्नांप्रती संवेदनशीलता या मुद्द्यांवर त्यांनी मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले.
आमदार किशोर जोरगेवार यांनीही भाजपच्या विकासकामांचा आढावा घेत मतदारांशी संवाद साधला. “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि जबाबदार प्रतिनिधी आवश्यक आहेत. भाजपचे उमेदवार हे प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असून त्यांना निवडून देणे म्हणजे चंद्रपूरच्या प्रगतीला गती देणे,” असे ते म्हणाले.
या प्रचारादरम्यान स्थानिक भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपने महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी तळागाळात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला असल्याचे या प्रचारातून स्पष्ट झाले. यावेळी त्यांच्या सोबत MEL प्रभागातील उमेदवार जितेश कुळमेथे, आशा देशमुख, नितेश गवळी, सविता सरकार सोबत भाजपा व प्रभागातील समर्थक बहुसंख्येने उपस्थित होते.







