मौजा वाघेझरी येथे ‘हळद रुसली लग्नाची’ नाटकाचे थाटात उद्घाटन…

51

प्रतिनिधी आदित्य चिप्पावार 
वाघेझरी (ता. एटापल्ली) :
मौजा वाघेझरी येथे आयोजित ‘हळद रुसली लग्नाची’ या नाटकाचे उद्घाटन काँग्रेस नेते प्रज्वल नागुलवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व थाटात पार पडले. या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक व ग्रामपंचायत स्तरावरील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
उद्घाटन प्रसंगी जारावंडी ग्रामपंचायतचे उपसरपंच सुधाकर भाऊ टेकाम, वाघेझरी सरपंच विलास कोंदामी, वेंनहार इलाका माजी अध्यक्ष सुधाकर भाऊ गोटा, गेदा ग्रामपंचायत सदस्य रमेश वैरागडे, माजी पंचायत समिती सभापती दुर्गुजी कोवासे, घोटसुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच बेबीताई हेडो, कसंसूर उपसरपंच छायाताई हिचामी, कसंसूर माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य सुनीलजी मडावी हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते.


याशिवाय चित्तरंजन दास, संदीप वैरागडे, सुनीता वैरागडे, सुरेश मटामी, सैन्यू मटामी, सोमजी गावडे, शालिक शेंडे, वाघेझरी उपसरपंच वनिता शेंडे यांच्यासह वाघेझरी परिसरातील आदिवासी विकास आघाडी (आविस) काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नाटकाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, संस्कृती जतन आणि ग्रामीण कलावंतांना व्यासपीठ मिळणे किती आवश्यक आहे, यावर आपले विचार व्यक्त केले. ‘हळद रुसली लग्नाची’ या नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून हास्य, सामाजिक संदेश व मनोरंजन यांचा उत्तम मिलाफ या सादरीकरणातून पाहायला मिळाला.
या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.