पराभवातही विजयाची छाप; पराभूत उमेदवार गाजला ! गडचिरोलीत बंटी खडसे च्या नावाची सर्वत्र चर्चा…

951

पराभवातही विजयाची छाप; पराभूत उमेदवार गाजला ! गडचिरोलीत बंटी खडसे च्या नावाची चर्चा…

जिल्हा प्रतिनिधी सतीश कुसराम

गडचिरोली:प्रभाग क्रमांक ५ ची निवडणूक ही केवळ एक निवडणूक नव्हती, तर ती राजकीय ताकदीची आणि नेतृत्वाच्या धैर्याची खरी परीक्षा होती. या निवडणुकीत सर्वसामान्य जनता तसेच राजकीय नेत्यांची संपूर्ण ताकद पणाला लागली होती. निकाल जरी कोणाच्याही बाजूने लागला असला, तरी जिंकणाऱ्यांपेक्षा पराभूत उमेदवाराचीच अधिक चर्चा होत आहे, हेच या निवडणुकीचे खरे वैशिष्ट्य ठरले आहे.

प्रभागातील भाजपा, काँग्रेस सारख्या मोठ्या पक्ष्यांच्या प्रबळ गड समजल्या जाणाऱ्या *प्रभाग ५- छत्रपती शाहू नगर, कन्नमवार वॉर्ड, विवेकानंद नगर* सारख्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीतही धाडसाने मैदानात उतरून लढा देणारे *शिवसेना शिंदे गटाचे नितेश उर्फ बंटी खडसे* यांनी भाजपा च्या प्रकाश निकुरे यांना धोबीपछाड करून अवघ्या ६ मतांनी काँग्रेस च्या उमेदवाराकडून शिकस्त खाल्ली पण यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रभाग ५ मधील स्थानिक लोकांचा पूर्ण कल नितेश उर्फ बंटी खडसे यांच्या कडे असलेला दिसून आलेला आहे, स्थानिक लोकांच्या चर्चेनुसार काँग्रेस च्या विजयी उमेदवाराने मतांची हेराफेरी करून विजय संपादन केलेला आहे अशी चर्चा रंगलेली आहे आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची लाट उमळून आलेली बघण्यात येत आहे.

पराभव झाला असला, तरी निवडणुकीच्या आधी, निवडणुकीनंतर आणि आजही प्रभागात तसेच संपूर्ण गडचिरोली शहरात चर्चा एका नावाची सुरू आहे ती म्हणजे नितेश उर्फ बंटी खडसे आणि ही चर्चा म्हणजे जनतेच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाची स्पष्ट पावती आहे.

“जनतेवरील माझा विश्वास आणि सेवाभाव कधीही कमी होणार नाही,” असा ठाम विश्वास व्यक्त करत नितेश उर्फ बंटी खडसे यांनी या निवडणुकीकडे अनुभव आणि शिकवण म्हणून पाहिले आहे. हा मतांचा हेराफेरी करून जिंकणाऱ्याचा पराभव असून नैतिकतेने पराभूत झालेल्यांचा खरा विजय आहे. या अंदाजाने नितेश उर्फ बंटी खडसे हे भविष्यातील मोठ्या विजय संपादन करू शकणार यामध्ये काही दुमत वाटत नाही, असेच चित्र आज राजकीय वर्तुळात दिसून येत आहे.