प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
घटनेनेची माहिती मिळताच भाजपा बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शाहा यांची रुग्णालयात धाव
घोट–चामोर्शी मार्गावर गौरीपूरजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत श्यामनगर येथील श्यामल मंडल हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती सुकदेव मंडल विक्रमपुर यांनी समाजसेवक प्रशांत शाहा यांना दिली.
माहिती मिळताच प्रशांत शाहा यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून जखमी श्यामल मंडल यांना चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्याने अपघातग्रस्ताचा जीव वाचण्यास मदत झाली.
याचबरोबर संपूर्ण घटनेची माहिती प्रशांत शाहा यांनी भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ शाहा यांना दिली.सुरेश शाहा यांनी वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तत्काळ उपचार सुरू करण्यास निर्देश दिले.
प्रशांत शाहा यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या समाजसेवी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.







