भाजपाला मिळणार तरुण नेतृत्वाच बळ: प्रलय म्हशाखेत्री यांची विद्यार्थी जिल्हाध्यक्षपदी निवड…!

159

प्रतिनिधी गौरव मोहबे

आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांचा भाजपमध्ये प्रवेश…

चंद्रपूर :भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर व कार्यकौशल्यावर विश्वास ठेवत, दि. 17 डिसेंबर 2025 रोजी चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी युवा नेतृत्व प्रलय म्हशाखेत्री यांची भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.हा पक्षप्रवेश सोहळा आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन कार्यालयात पार पडला. यावेळी नियुक्तीनंतर प्रलय म्हशाखेत्री यांनी आपले मनोगत व्यक्त करत, विद्यार्थ्यांचे प्रश्न, युवकांचे भवितव्य आणि संघटनात्मक बांधिलकी यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला..

प्रलय म्हशाखेत्री हे वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष असून वक्तृत्व क्षेत्रात त्यांची विशेष ओळख आहे. त्यांनी अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व व वादविवाद स्पर्धांमध्ये विजय मिळवला असून विविध सामाजिक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे त्यांनी नेहमीच चंद्रपूर जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले आहे.गेल्या सात वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आहेत. अखेर त्यांनी आपल्या कार्याला व्यापक व्यासपीठ मिळावे, यासाठी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या सोबत शेकडो युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्ष संघटनेला मोठे बळ मिळाले आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपला युवक नेतृत्वाच्या माध्यमातून निश्चितच मजबुती मिळणार, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार ,भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवी शिंदे ,माजी महापौर राखी कंचर्लावार, महिला महानगर जिल्हाध्यक्ष छबुताई वैरागडे ,नामदेवजी डाहुले, रघुवीर अहिर ,मनोज पाल ,रवी गुरनुले व इतर मान्यवर उपस्थित होते.