विदर्भ नागरी/ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कर्मचारी संघाची विशेष सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

107

विदर्भ नागरी/ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कर्मचारी संघाची विशेष सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

संपादक प्रशांत बिट्टूरवार

नागभिड : विदर्भ नागरी/ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कर्मचारी संघ (भारतीय मजदूर संघ संलग्न) यांची विशेष सर्वसाधारण सभा नागभीड येथील कर्मवीर सोसायटी, नवीन बसस्टॉप जवळ मोठ्या उत्साहात पार पडली. सभेची सुरुवात मागील सभेचा इतिवृत्त वाचनाने झाली असून सभासदांच्या एकमताने त्यास मंजुरी देण्यात आली.

या सभेमध्ये पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. या विशेष सभेचे अध्यक्षपद श्रीयुत तुकाराम बळीरामजी गायकवाड (व्यवस्थापक, लक्ष्मी पतसंस्था, मेंडाळा – बागलमेंढा) यांनी भूषविले. त्यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली.

नवीन संचालक मंडळामध्ये
अशोकजी पिसे, विनोदजी बारापात्रे, किशोर कांबळे, गजानन वाकडे, राजू डहारे, जोशना बोरकुटे, संतोष शनगरवार, सुरज शास्त्रकार, श्रीकांत लेंजे, सदानंद कोठेवार, सुनील पोगुलवार, संतोष आकुलवार व तुकारामजी गायकवाड
असे एकूण १३ संचालक नियुक्त करण्यात आले.

सभेमध्ये माननीय अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. अनेक सभासदांनी आपले मनोगत व्यक्त करत पतसंस्था कर्मचारी वर्गासमोर असलेल्या अडचणी, समस्या व त्यावरील संभाव्य उपायांवर सखोल चिंतन व मंथन केले. चर्चा अत्यंत सकारात्मक व मार्गदर्शक ठरली.

कार्यक्रमाची सांगता कल्याण मंत्राने करण्यात आली. या विशेष सभेला चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एकूण सुमारे १०० सभासदांनी उपस्थित राहून चर्चेत सक्रिय सहभाग नोंदविला. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

यावेळी उपस्थित सर्व सभासदांनी नवनियुक्त संचालक मंडळाचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.