पेरमिली येथे सरकारी धान खरेदी केंद्र त्वरीत सुरू करा…

47

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गटा) कडून केली मागणी
—————————————————-

प्रतिनिधी रवींद्र सदमवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तर्फे आदिवासी विकास महामंडळ कडून नविन धान खरेदी केंद्र त्वरीत सुरू करण्यासंदर्भात निवेदन हे अहेरी महामंडळचे उपप्रादेशिक व्यवस्थापक अधिकारी यांना देण्यात आला.
यावेळी अहेरी येथील आदिवासी विकास महामंडळचे उपप्रादेशिक कार्यालयात भेट देऊन, उपप्रादेशिक व्यवस्थापक अधिकारी – एस.एल.राजुरे यांच्यासोबत शेतकऱ्यांचे सन २०२५ या चालु वर्षाचा नविन धान खरेदी हे त्वरीत सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आला.
याचर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी उपप्रादेशिक व्यवस्थापक अधिकारी यांना म्हणाले की, पेरमिली धान खरेदी केंद्र सह आपला कार्यालय अंतर्गत येणारे – अहेरी, एटापल्ली, भामरागड या तिन्ही तालुक्यामधील सर्व धान खरेदी केंद्रामध्ये असलेले जुने धानाची उचलणं करून, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे यावर्षीचा नविन धान त्वरीत खरेदी सुरू करावे.असे म्हणाले. तेव्हा उपप्रादेशिक व्यवस्थापक अधिकारी म्हणाले की, मी लवकरच माझा कार्यालय अंतर्गत येणारे सर्व सोसायटी /धान खरेदी केंद्रातील सचिवांना सांगतो की, तुम्ही सर्व सोसायटीचे अध्यक्ष आणि सभासदांचा बैठक घेऊन, शेतकऱ्यांचे यावर्षीचा नविन धान खरेदी करण्यासाठी पर्यायी नविन जागाची उपलब्ध करण्यासाठी चर्चा करायला सांगतो. तसेच जुने धान लवकरच लवकर उचलुन, सर्व गोडाऊन खाली करून, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नविन धान लवकरत लवकर खरेदी सुरू करण्यासाठी पुर्ण प्रयत्न करतो असे म्हणाले.
यावेळी महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून, निवेदन देतांना – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच – बालाजी गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव – कैलास कोरेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी तालुकाध्यक्ष – नागेश मडावी, माजी पंचायत समितीचे सदस्य – मंतय्या आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते – जावेद अली, अमरनाथ गावडे, तिरुपती मडावी, योगेश तलांडी सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.