जि. प. शाळांमधील शिक्षकांची हजारो पदे रिक्त – विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार…

85

विद्यार्थ्यांचे भवितव्याचा गंभीर प्रश्न – सरकार गंभीर नसल्याचा आरोप

संपादक प्रशांत बिट्टूरवार

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ३७ हजार शिक्षकांची पद रिक्त आहेत. जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे, सरकारने या रिक्त जागा मर्यादित कालावधीत भराव्यात अशी मागणी आज विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. एकीकडे शिक्षकांची पदे रिक्त आहे, दुसरीकडे राज्यात ५५ हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या बातम्या येतात. शिक्षण हा इतका महत्वाचा विषय असूनही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षकांची पदे रिक्त आहे. सात वर्ग आणि फक्त तीन शिक्षक विद्यार्थी काय शिकणार? त्यामुळे सरकारने राज्यात शिक्षकांची किती रिक्त पदे आहेत, आणि एका मर्यादित कालावधीत या जागा भराव्या अशी मागणी केली.

यावर उत्तर देताना मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यात १५ हजार शिक्षकांची पद रिक्त असल्याची माहिती सभागृहात दिली, यावर आक्षेप घेतला. राज्यात ३७ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत, अधिकारी सरकारची दिशाभूल करत आहे, सरकारच्या पोर्टलचे नाव पवित्र असले तरी अपवित्र काम सुरू आहे.

या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री गोरे यांनी मान्य केले चंद्रपूर जिल्ह्यात ४७२ जागा रिक्त आहेत. राज्यात शिक्षक भरतीबाबत नवीन पद्धत आणण्याची गरज आहे असे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.