संताजी जगनाडे महाराजांचा ४०१ वा जयंती महोत्सव साजरा…

91

तालुका प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार 
भामरागड – येथील तैलीक समाज समिती अंतर्गत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांचा ४०१ वा जयंती महोत्सव ८ डिसेंबर २०२५ रोजी तैलीक समाज भवन भामरागड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीराम नरताम तैलीक समाज समितीचे अध्यक्ष हे होते.प्रमुख अतिथी सत्यमजी साठवणे, राजेशजी डेहनकर, संतोष बडगे होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सेलोकर सर,लोककवी दादाजी कुसराम, तर विशेष अतिथी म्हणून श्रीमती रामबाई महाका नगराध्यक्ष नगरपालिका भामरागड, तपेश हलदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.तद्नंतर भामरागड नगरात संताजी महाराजांच्या जयघोषात दिंडी काढण्यात आली.तैलीक समाज भवनाच्या आवारात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची,चमचा-गोळी स्पर्धा, तर पुरुषांसाठी रस्सीखेच स्पर्धा व विविध खेळ घेण्यात आले.तद्धतच सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संताजी जगनाडे महाराज चौकाचे मान्यवरांचे हस्ते अनावरण करण्यात आले.यावेळी प्रा.डॉ. सेलोकर सर व लोककवी दादाजी कुसराम यांनी जगनाडे महाराजांच्या कार्यावर विस्तृत मार्गदर्शन केले. “ माझिया जातीचे मज भेटो कोणी। आवडीचे धनी पुरवाया। माझिया जातीचा मजसी मिळेल। येथे गबाळांचे काम नाही।या अभंगाचे सादरीकरण करून विस्ताराने अर्थबोध सांगण्यात आला
कार्यक्रमाचे संचालन अशोक चापले यांनी केले.पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार प्रमोद चापले यांनी मानले तर सौ.मिनल साठवणे यांनी स्वागत गीत सादर केले.कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी महेंद्र कोठारे, संदीप मोगरे, किशोर गव्हारे, राजेंद्र कोठारे, दिनेश गव्हारे, श्रीकांत नरताम, विलास कोठारे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाला परिसरातील बहुतांश स्त्री-पुरुष उपस्थित होते. स्नेहभोजनांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.