धानोरी येथे ६२ वा बुद्धमूर्ती स्थापना वर्धापन दिन सोहळा; ११ डिसेंबरपासून त्रिवार कार्यक्रमाचे भव्य आयोजन!…

149

दिनेश मंडपे
कार्यकारी संपादक

धानोरी,भंडारा:

सिद्धार्थ सेवा मंडळ, धानोरी यांच्या वतीने आयोजित ६२ वा बुद्धमूर्ती स्थापना वर्धापन दिन सोहळा येत्या गुरुवार, शुक्रवार व शनिवार म्हणजेच दि. ११, १२ व १३ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. डॉ. आंबेडकर चौक, धानोरी येथे आयोजित केलेल्या या तीन दिवसीय धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तीन दिवसीय कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा:

गुरुवार, ११ डिसेंबर:
सकाळी ०५.०० वाजता बुद्ध वंदना आणि ग्रामस्वच्छता अभियान.
महानायिका रमाई महिला समता परिषद आयोजित करण्यात आली आहे.
सायंकाळी ८.३० वाजता बौद्धिक प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, १२ डिसेंबर:
सायंकाळी ५.०० वाजता बुद्धवंदना.
या दिवशी रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी व आरोग्य तपासणी शिबिर असे समाजोपयोगी कार्यक्रम होणार आहेत.
सायंकाळी ६ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
रात्री १० वाजता सिद्धार्थ सेवा भजन मंडळतर्फे भजनाचा कार्यक्रम होईल.
शनिवार, १३ डिसेंबर (समारोप):
सकाळी ०५.०० वाजता उपासक-उपासिकांचे व शिबिरार्थी बुद्धवंदना.
सकाळी ११.०० वाजता झेंडावंदन व मानवंदना कार्यक्रम.
समारोपाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपासून सिद्धार्थ सेवा मंडळ तर्फे भोजनदान आयोजित करण्यात आले आहे.

प्रमुख मान्यवर व मार्गदर्शन:

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. सखाराम मंडपे आणि उपाध्यक्ष म्हणून मा. मोरेश्वरजी मंडपे हे उपस्थित राहतील.
या सोहळ्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. निरज बोधी (प्रा. रा. तु. म.वि. वि. नागपूर), तसेच मा. श्री. पी. एस. खोब्रागडे व मा. चंद्रभूषण मेश्राम यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.
सिद्धार्थ सेवा मंडळाच्या वतीने परिसरातील सर्व नागरिकांना या धार्मिक व समाजोपयोगी कार्यक्रमांना उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवण्याचे आणि प्रबोधनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.