पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांचा गडचिरोली दौरा; फुलनार, गर्देवाडा व लाहेरीत विविध विकास उपक्रमांचा शुभारंभ

138

अतिदुर्गम भागात पोलीस सेवांचा नवा आयाम

पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांचा गडचिरोली दौरा; फुलनार, गर्देवाडा व लाहेरीत विविध विकास उपक्रमांचा शुभारंभ

तालुका प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांनी दिनांक 09 डिसेंबर 2025 रोजी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करीत भामरागड व हेडरी उपविभागातील अतिसंवेदनशील आणि दुर्गम भागांमध्ये नवनिर्मित पोलीस मदत केंद्रे, जनजागरण मेळावा व विविध सार्वजनिक सुविधांचे उद्घाटन केले.

फुलनार कॅम्प गुंडूरवाहीमध्ये भेट व भव्य जनजागरण मेळावा

अतिसंवेदनशिल पोमकें फुलनार कॅम्प गुंडूरवाही येथे भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या अभियानाची तयारी पाहणी केली. यावेळी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात 500 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. नागरिकांना स्प्रे पंप, स्वयंपाकाची भांडी, शिलाई मशीन, ब्लॅंकेट, कपडे, साड्या, चप्पल, सायकली, शालेय साहित्य, क्रिकेट व व्हॉलीबॉल किट आदी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.

नागरिकांशी संवाद साधताना पोलीस महासंचालकांनी सांगितले की,

> “या नव्या पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अतिदुर्गम भागात रस्ते, आरोग्यसेवा व इतर सुविधा लवकरच उपलब्ध करून देऊ. माओवादाचा पूर्णतः अंत करून गडचिरोलीचा विकास करू.”

गर्देवाडा येथे 74 वे सार्वजनिक वाचनालय व बिरसा मुंडा पुतळ्याचे लोकार्पण

उपविभाग हेडरी अंतर्गत अतिसंवेदनशिल पोमकें गर्देवाडा येथे ‘एक गाव, एक वाचनालय’ या उपक्रमांतर्गत 74 व्या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

500 पेक्षा जास्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी पारंपारिक वेशभूषा व वाद्यांसह उत्स्फूर्त सहभाग घेतला.

नंतर गावात भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे लोकार्पणही करण्यात आले. हा पुतळा गावकऱ्यांच्या सहभागातून उभारण्यात आला आहे.

लाहेरी येथे नवीन पोलीस प्रशासकीय इमारतीचे उद्‌घाटन

या दौऱ्यात लाहेरी येथील नव्या पोलीस उप-स्टेशनच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनही करण्यात आले. सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज या इमारतीमुळे अधिकारी, अंमलदार तसेच सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे

पोलीस उप-महानिरीक्षक श्री. अंकित गोयल

डीआयजी (अभियान) सिआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा

पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल

अपर पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश

अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा

एसडीपीओ अमर मोहिते, योगेश रांजणकर
तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.