प्रतिनिधी रवींद्र सदमवार
दुब्बागुडा, ता. भामरागड येथे डी कॅपिटल क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ग्रामीण क्रिकेट स्पर्धेला गावकऱ्यांचा आणि युवा क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिनांक 05 डिसेंबर रोजी डी कॅपिटल क्रीडांगणावर या स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन झाले.
उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील तरुणांना संधी मिळण्यासाठी अशा मंचांचे महत्त्व अधोरेखित केले.
उद्घाटक श्री. सुधाकरराव तीम्मा यांनी ग्रामीण खेळाडूंमध्ये असलेल्या प्रचंड प्रतिभेला योग्य दिशा देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगत आयोजकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक शिवसेना नेते श्री. संदीपभाऊ कोरेत यांनी खेळाडूंना शिस्त, खेळ भावना आणि संघभावना जपण्याचे आवाहन केले.
स्पर्धेत आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून—
• प्रथम पारितोषिक : ₹31,001/-
• द्वितीय पारितोषिक : ₹21,001/-
• तृतीय पारितोषिक : ₹11,001/-
तसेच बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट किपर, मॅन ऑफ द सिरीज आदी व्यक्तिगत गौरव पुरस्कारांचे वितरणही करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे आयोजन श्री. गीसुजी पुंगाटी, श्री. सन्नुजी वड्डे, चैतुजी पिडसे, बन्नाजी पुंगाटी, मनोज पिडसे, कोलूजी पुंगाटी, गिसुजी मिच्छा, संतोष तेलामी, संदीप धानोरकर तसेच स्थानिक युवकांच्या सहकार्याने करण्यात आले.
परिसरातील नागरिक, क्रीडाप्रेमी व युवकांचा मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायला मिळत असून दिवसभर सामने रंगणार आहेत. अंतिम सामन्यात विजेत्यांचा निर्णय होणार असून स्पर्धा अधिक रोमांचक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा आयोजित केल्याबद्दल स्थानिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.







