जिओ मोबाईल कंपनीकडून रिचार्जबाबत बळजबरी? चामोर्शीतील मोबाईल दुकानदारांचा निषेध!…

612

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
जिओ मोबाईल कंपनीकडून फक्त ₹349 चा व त्यावरील रिचार्ज ग्राहकांना द्या,₹349 च्या खालील रिचार्ज देऊ नका असे केल्यास आम्ही तुम्हाला तुमचे रिचार्ज सेवा बंद करू असा दबाव मोबाईल दुकानदारांवर टाकला जात असल्याचा गंभीर आरोप चामोर्शी येथील मोबाईल दुकानदाऱ्यांनी केला आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये नाराजी पसरली असून दुकानदारही संतप्त झाले आहेत.

“जिओ कंपनीचे अधिकारी आम्हाला सूचित करत आहेत की ₹349 शिवाय इतर कोणताही रिचार्ज ग्राहकाला करू नका. मात्र कंपनीकडे इतर सर्व रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. मग ग्राहकांना पर्याय न देता जबरदस्ती कशासाठी?”
या प्रकारामुळे कमी किमतीचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक ग्राहकांना अनावश्यक महागडे प्लॅन घ्यावे लागत असल्याची तक्रारही पुढे आली आहे.

दुकानदारांनी या बळजबरीच्या धोरणाचा तीव्र निषेध नोंदवला असून जिओ कंपनीने तातडीने या आदेशाची स्पष्टता करावी, अशी त्यांची मागणी आहे. अन्यथा ग्राहक व दुकानदार यांच्या हितासाठी पुढील आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिचार्ज प्लॅनचा पर्याय खुला ठेवून पारदर्शक सेवा देण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.

आज चामोर्शी येथे जियो रिचार्ज विक्रेता व्यावसायिकाची मीटिंग झाली त्या मीटिंगला बल्लारशा जियो पॉईंटचे चंद्रशेखर सर, व संजय सर तर येथील जियो व्यावसायिक गुड्डू तिवारी, प्रकाश राय, केतन कत्रोजवार, ब्रिजेश विश्वास, रुपेश लाड सह १६ जण उपस्थित होते या मीटिंग मध्ये कंपनीच्या प्रतिनिधीला जियो रिचार्ज विक्री बाबत ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणी सांगितल्या पण कंपनी काही एक न ऐकता ३४९ चे रिचार्ज विकावे लागेल अन्यथा रिजार्ज देणे बंद करू असे स्पष्ट सांगितल्या मुळे जियो रिचार्ज विक्री करणारे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

ग्राहकाची प्रतिक्रिया

सुरुवातीला जियो कंपनी कडून स्वस्त दरात रिचार्ज देत होते त्यानंतर जस जसे ग्राहक संख्या वाढत गेली तस तसे कंपनी कडून रिचार्ज मध्ये वाढ करत गेले आता कंपनी आम्हा ग्राहकांना २९९ चे व त्याचे खालील रिचार्ज देत नाही हे ग्रामीण भागातील ग्राहकावर अन्याय करत आहे, कमी दराचे रिचार्ज उपलब्ध असताना मिळत नसतील तर नाईलाजाने जियो रिचार्ज घेणे बंद करावे लागेल.
वैष्णवी सोनटक्के जियो ग्राहक

मोबाईल दुकानदार यांची प्रतिक्रिया 

आम्ही गेल्या काही वर्षांपासून जियो कंपनी द्वारा रिचार्ज विक्री करण्याचा व्यवसाय करत आहोत आमच्याकडे येणारे ग्राहक हे ग्रामीण भागातील असल्याने त्यांना त्यांच्या सोयी नुसार २९९ पासून रिचार्ज विकत होतो पण नुकतेच जियो कंपनी द्वारा या पुढे ग्राहकांना ३४९ पासूनचे रिचार्ज विकावे त्याचे खाली विकल्यास तुमचे जियो चे बॅलन्स मिळणार नाही त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे जियो कंपनी आमच्यावर ३४९ वरचे रिचार्ज विकण्याचा तगादा लावला तो अन्यायकारक आहे
रुपेश लाड, व्यावसायिक रुपेश कमुनेकेशन चामोर्शी