भेंडाळा येथे संध्याताई दूधबळे पेट्रोलियम पंपाचे भव्य उदघाटन…

83

विशेष प्रतिनिधी चामोर्शी

मा. आमदार राजे धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची विशेष उपस्थिती

चामोर्शी – चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे संध्याताई दूधबळे पेट्रोलियम या नवीन पेट्रोल पंपाचे उदघाटन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी, राकापा जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, नागपूर येथील मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक आशिष वर्मा तसेच चंद्रपूरचे सहाय्यक विक्री अधिकारी प्रतीक तागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवीन पेट्रोल पंप सुरू झाल्याने चामोर्शी ते मूल, चंद्रपूर, नागपूर तसेच आष्टी मार्गावरील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या परिसरातील 15 ते 20 किमी अंतरावरील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आता इंधन भरण्यासाठी दूरवर जावे लागणार नाही. सोयीस्कर सेवा, दर्जेदार इंधन आणि आधुनिक सुविधा यांमुळे भेंडाळा परिसरातील नागरिक आणि प्रवासी वाहनधारकांना हा पंप नवीन उर्जा देणारा ठरला आहे. यावेळी पेट्रोल पंप चे संचालक डॉ. तामदेव दूधबळे, तुषार दूधबळे, किरण दूधबळे, अद्विका दूधबळे सहित परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.