अहेरी–मुलचेरा–देवदा–रेगडी– वीकासपल्ली मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी…

120

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
अहेरी–मुलचेरा–देवदा–रेगडी–
विकासपल्ली या महत्त्वाच्या मार्गावर तात्काळ बससेवा सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा सचिव प्रशांत शाहा व तालुका प्रमुख पप्पी पठाण यांनी केली आहे.

सदर मार्गावर प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण व रोजंदारी कामगारांना बससेवा नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांमधील नागरिकांना प्रवासासाठी खाजगी वाहनांवर अवलंबून रहावे लागत असून प्रवास खर्चातही मोठी वाढ झाली आहे.

प्रशांत शाहा यांनी सांगितले की, “दररोज शेकडो नागरिक या रस्त्यावरून प्रवास करतात.या मार्गावर बससेवा सुरू झाल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल.”
तालुका प्रमुख पप्पी पठाण यांनीही या मागणीचे समर्थन करत तातडीने बसचालना सुरू करण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

नागरिकांच्या वाढत्या मागणीनंतर आता संबंधित विभागाने या विषयावर सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुलचेरा तालुक्यातील काही गावे रेगडी परिसरात आहेत
गरंजी, देवदा,वेंगनुर,पडको टोला,
गट्टा,अशा गावाचा समावेश आहे तरी परिवहन विभागाने लक्ष देऊन तत्काळ या मार्गावर बस सेवा सुरू करावी
प्रशांत शाहा जिल्हा सचिव शिवसेना शिंदे गट