भाजपाचे विकासात्मक धोरण नवी दिशा देणारे—आमदार देवराव भोंगळे…

137

संपादक प्रशांत बिट्टूरवार

राजुरा येथील सोमनाथपूर वार्डातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश

राजुरा : सर्वांगीण विकास हेच भाजपा सरकारचे प्रमुख ध्येय आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रीत करून विकासकामे वेगाने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकासाभिमुख कार्यासाठी जनता भाजपाच्या पाठीशी असल्यामुळे राजुरा मतदारसंघात विकासकामे वेगाने पूर्ण होत आहे. असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात सोमनाथपूर वार्डातील प्रभाकर येरणे यांचेसह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.

आमदार भोंगळे पुढे म्हणाले, भाजप सरकारच्या कार्यशैलीमुळे तळागाळातील सर्वसामान्य जनतेला विकासाचा नवा मार्ग गवसला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागले असून विकासासाठी जनता भाजपच्या पाठीशी उभी आहे असे आमदार देवराव भोंगळे यांनी सांगितले.

यावेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये प्रभाकर येरणे, अशोक कोहपरे, गजानन येरणे, सविता शेळके, मधुकर शेरकी,किरीट बोल्लप, निलेश मेश्राम, अमन शेख, इम्रान शेख, मोहम्मद शेख, सुधीर मेश्राम, महादेव शेंडे,मनोज पवनकर ,प्रवीण शेंडे, फॅजान शेख, गोपाल शिंदे, धीरज बिस्वास, विवेक राठोड,रवी यादव, उद्देश दुर्गे, आदित्य वडस्कर, रितिक मुसळे , चेतन सोनटक्के, गौरव पोटे, तुषार खोबरे, शुभम भटवलकर यांचा समावेश आहे.

नव्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राजुरातील भाजपाची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिशजी शर्मा, शहराध्यक्ष सुरेश रागीट, महामंत्री मिलिंद देशकर, सचिन डोहे, शहर महामंत्री सचिन भोयर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय राठोड , भाजयुमोचे शहराध्यक्ष प्रफुल घोटेकर, राधेश्याम अडाणीया ,विनोद नरेंदूलवार, बाबुराव मडावी,सुरेश धोटे, महिला मोर्चाच्या राजुरा शहराध्यक्षा माया धोटे, माजी नगरसेविका उज्ज्वला जयपूरकर, योगिता भोयर, ममता केशट्टीवार, अमोल चिल्लावार, प्रदीप मोरे, यांचेसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.