Home Breaking News हळदवाही -मेकपल्ली नंतर हत्तीचा कळप आता विकासपल्ली मध्ये दाखल…

हळदवाही -मेकपल्ली नंतर हत्तीचा कळप आता विकासपल्ली मध्ये दाखल…

178
oplus_0

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल – नुकसान भरपाईची मागणी

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट:

चामोर्शी तालुक्यातील हळदवाही -मेकपल्ली परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर हत्तींचा कळप आता रेगडी परिसरातील विकासपल्ली येथे दाखल झाला असून, शेतकऱ्यांच्या शेतीमधील धानाचे ढिगारे, पिके आणि शेती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या कळपामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.

काल रात्री उशिरा हत्तींच्या कळपाने विकासपल्ली शेतशिवारात प्रवेश करून पिकांची नासधूस केली. अनेक शेतकऱ्यांचे धानाचे साठे उद्ध्वस्त झाले आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपा बंगाली आघाडी चे जिल्हा अध्यक्ष सुरेश शाहा यांनी आमदार मिलिंद नरोटे यांच्याशी संपर्क साधून याविषयी माहिती दिली असता यावर मिलिंद नरोटे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे सूचना दिल्या

व सुरेश शाहा यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच हत्तींच्या कळपाला जंगलाकडे परत पाठविण्यासाठी वन विभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मनोरंजन गुरुचरण हलधर ,

मृत्युंजय मृणाल सेन ,

नेपाल राजबीहारी मिरधा

शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या नुकसानीची योग्य दखल घेऊन त्वरित आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Don`t copy text!