प्रतिनिधी शरद कुकुडकर
गोंडपिपरी
चंद्रपूर जिल्हाची वाघाचा जिल्हा अशी ओळख दुरवर पोहचली आहे.असे असले तरी जिल्हात दुर्मिळ वन्यजीव आणि दुर्मिळ पक्षांचा अधिवास आहे. वाघाचा स्वरक्षणासोबतच पक्षांचे संरक्षण करणे हे महत्वाचे कार्य वनविभाग करीत आहे.पक्षी सवर्धनासाठी सामान्य जनतेची मदत फार गरजेची आहे. वन, वनजीवांच्या स्वरक्षणासाठी गावकरी पुढे येत आहेत, हे फारच सुखध चित्र असल्याचे वनपरीक्षेत्राधिरी गौरकार
यांनी म्हटले.पक्षी सप्ताह निमित्याने गोंडपिपरी येथील जनता महाविद्यालय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मध्य चांदा वनविभाग वनपरीक्षेत्र धाबा,सामाजिक वनिकरण विभाग आणि निसर्ग सखा संस्थेकडून पक्षी सप्ताह निमित्ताने गोंडपिपरी येते जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष,पक्षीमित्र दिपक वांढरे यांनी गोंडपिपरी भागात आढळून येणाऱ्या विविध पक्षांची माहिती दिली. गोंडपिपरी तालुक्यातील तलाव, पाणवठ्यावर दुर्मिळ असलेले स्थलांतरित पक्षी येत असतात. या पक्षांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती गरजेचे असल्याचे मत प्राचार्य डॉ.मोहन गिरिया यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पक्षी मित्र उपस्थित होते.
चंद्रपुरात सारस पक्षी होते. आज ते दिसेनासे झाले आहेत. कधी गिधाड पक्षी मोठ्या संख्येने दिसायचे, आज ते दुर्मिळ झालेत. याप्रमाणे अनेक पक्षी वन्यजीव दुर्मिळ झाले आहेत. त्यांचे संरक्षण आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज असल्याचे मत सामाजिक वनिकरण विभागाचे वनरक्षक बालाजी बिंगेवाड यांनी व्यक्त केले. पक्षी सप्ताह निमित्ताने गोंडपिपरी तालुक्यातील तलावावर पक्षीमित्रांनी पक्षी निरीक्षण केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विकास कोकाटे होते मंचावर संतोष बांदूरकर होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. प्रशांत नारनवरे यांनी केले. कार्यक्रमात जनता महाविद्यालय विद्यार्थी व पक्षीमित्र उपस्थित होते.







