सुदामभाऊ राठोड यांची मागणी
बळीराम काळे, जिवती
जिवती (ता.प्र.) : तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या पिकनुकसानीची पंचनामे तलाठी मार्फत करण्यात आले होते, परंतु सरसकट न पंचनामे करता कुठे कुठे 0.28 अशी नुकसान दाखवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हजार दोन हजार रुपये फक्त एवढेच पैसे जमा होत आहे हि अशी तुटपुंजी मदत आम्हा शेतकऱ्यांना नको आहे,आम्हाला सरसकट 8500 हेक्टरी प्रमाणे मदत आमच्या खात्यात जमा झाली पाहिजे कारण, आजच्या घडीत शेतकरी राजा संकटामध्ये आहे .उभे पीक पाण्यात सडून गेले आहे सततच्या अती पाऊसामुळे पूर्ण पीक नासून गेले आहे.
एकीकडे निसर्ग कोपतो आहे. आणि दुसरी कडे सरकार सुद्धा शेतकऱ्यांची थटा करत आहे. एका दाण्याचे हजार दाणे उत्पन्न करणारा माझा शेतकरी माय बाप यांच्या वर नेहमीच सरकार अन्याय करताना दिसते म्हणून जोपर्यंत जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट 8500 प्रमाणे अतिवृष्टी नुकसानीची मदत खात्यामध्ये जमा होतानाही तिथपर्यंत आम्ही दि. 30/10/2025 गुरुवार पासून तहसील कार्यालय जिवती मध्येच ठिय्या मांडून त्याच ठिकाणी मुकाम करू कारण, सर्व शेतकरी मायबापचे सततच्या पाऊसामुळे खूप मोठया प्रमानामध्ये नुकसान झाले आहे.
म्हणून शासन आणि प्रशासन यांनी तात्काळ या गंभीर समस्याची दखल घेऊन तात्काळ मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे हि विनंती मागणी पूर्ण होईपर्यंत तहसीलदार कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करू याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी.
अशा ईशारा सुदाम राठोड यांनी दिला आहे.







