Home Breaking News उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे,Run For unity अंतर्गत 3KM Marathon स्पर्धेचे आयोजन…

उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे,Run For unity अंतर्गत 3KM Marathon स्पर्धेचे आयोजन…

292

तालुका प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार भामरागड

देशात दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ५५० हून अधिक संस्थानांचे देशात विलीनीकरण करण्याच्या त्यांच्या अतुलनीय
कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा दिवस ‘राष्ट्रीय एकता दिवस’ किंवा ‘राष्ट्रीय एकात्मता दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
गडचिरोली जिल्हा पोलीस दल अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भामरागड व उप पोलीस स्टेशन लाहेरीच्या वतीने उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे सकाळी 06:30 वाजता Run For unity अंतर्गत 3KM Marathon स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर मॅरेथॉन स्पर्धेकरिता उप पोलीस स्टेशन लाहेरी हद्दीतील 50 ते 60 युवक – युवती व उप पोलीस स्टेशन लाहेरी चे अधिकारी / अंमलदार व SRPF चे अधिकारी / अंमलदार व CRPF चे अधिकारी / अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. सदर मॅरेथान स्पधेचे उद्घाटन सी.आर.पी.एफ 37 बटालियन चे OC मा. श्री. सचित्र बिश्वाल सर, तसेच उप पोस्टे लाहेरी चे ता. प्रभारी अधिकारी पोउपनि आकोश पुयड तसेच व पोलीस स्टेशन लाहेरीचे जिल्हा पोलीस हवालदार विशाल उमरे, पोना पुसु कंगाली, पोलीस अंमलदार गोवर्धन सुर्यवंशी,अशोक मडावी, राकेश मेश्राम, राकेश देशमुख, प्रविण गडपायले राजु हुर्रा, तसेच महिला पोना प्रिती पल्लो, मपोअं शेवंती सुल्वावार, मुस्कानबानो शेख तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरीचे येथील आरोग्य अधिकारी मा. डॉ. ऋषीकेश उडान सा. त्यांचे स्टॉप सह उपस्थित होते. व ॲम्बुलन्स ची व्यवस्था करण्यात आली. तसेच या मॅरेथॉन स्पर्धामध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक विजय पुंगाटी रा. लाहेरी,द्वितीय क्रमांक विलास मंगरू ओक्सा रा. मल्लमपोदूर, तृतीय क्रमांक राकेश श्रीनिवास ओक्सा यांनी पटकवला. मुली मध्ये प्रथम क्रमांक सोनी रामजी पुंगाटी रा. कुमनार हिने पटकवला. सर्व विजेत्यांना पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
उप पोलीस स्टेशन लाहेरीचे मार्फत स्पर्धेत उपस्थित सर्व युवक युवतींसाठी चहा – नाश्ता, शरबत, ची व्यवस्था करण्यात आली होती.

Don`t copy text!