Home Breaking News एटापल्लीतील राजकारणात प्रचंड खळबळ,नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ज अवैध…

एटापल्लीतील राजकारणात प्रचंड खळबळ,नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ज अवैध…

385

नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ज अवैध

रेखा मोहुर्ले विरुद्ध दिपयंती पेंदाम यांच्यात रस्सीखेच

एटापल्लीतील राजकारणात प्रचंड खळबळ

भाजप विरुद्ध कांग्रेस थेट लढत

तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार

एटापल्ली : नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सरीता जानू गावडे यांचा नामनिर्देशन फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांनी थेट अवैध ठरविला आहे. फॉर्म सादर करताना उमेदवार तसेच सुचवणारे व अनुमोदक प्रत्यक्ष उपस्थित नसल्याचे कारण देत हा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नियमांचे काटेकोर पालन न केल्याने अर्ज तपासणीदरम्यानच बाद ठरविण्यात आला. या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली असून, कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पुनर्विचाराची मागणी केली असली तरी निकालावर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

दरम्यान, भाजपाच्या रेखा गजानन मोहुर्ले व काँग्रेसच्या दिपयंती निजन पेंदाम यांच्यात आता थेट रस्सीखेच सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचा फॉर्म बाद झाल्याने या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये निवडणुकीचे समीकरण चांगलेच चिघळले आहे. राजकीय गलियार्‍यात चर्चांना उधाण आले असून, “ही निवडणूक थेट प्रतिष्ठेची लढत ठरणार” अशी चर्चा रंगली आहे.

निवडणूक अधिकारी म्हणाले की, “निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. नियमबाह्य फॉर्म कोणाचाही असो, त्याला मान्यता दिली जाणार नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा फॉर्म बाद झाल्याने आता एटापली नगराध्यक्ष पदाची लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशा दोन शक्तीशाली पक्षांत रंगणार असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे

Don`t copy text!