Home Breaking News रुग्णाला रक्त मिळवून देण्यासाठी समाजसेविकेचे तत्पर कार्य…

रुग्णाला रक्त मिळवून देण्यासाठी समाजसेविकेचे तत्पर कार्य…

241

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट :
महिला रुग्णालयातून घोट गावातील पौर्णिमा कांदो रुग्णास रक्ताची आवश्यक गरज असल्याची माहिती समाजसेविका शीतलताई सोमनानी यांना प्राप्त झाली. तात्काळ प्रतिसाद देत त्यांनी संबंधित रुग्णाशी संपर्क साधला.

या प्रकरणात समाजसेविका शीतलताई भोलूभाऊ सोमनानी व शोभाताई सोमनाणी, स्वप्नील पोगुलवार, संचित येनगंटिवार, अर्पित दुधबावरे, प्रमोद सातार, अभिषेक गुरणुले, संकेत कुनघाडकर व इतर कार्यकर्ते यांनी रुग्णालयात जाऊन तातडीने मदतकार्य केले. परिस्थितीची पाहणी करून वैद्यकीय अधिकारी व रुग्ण सोबत चर्चा करण्यात आली. त्यांच्या प्रयत्नांमुळे रक्ताचा प्रश्न मार्गी लागला व रुग्णास आवश्यक मदत वेळेत मिळाली.

या तात्पुरत्या आणि संवेदनशील कार्यामुळे समाजात समाजसेविकेच्या कार्याची प्रशंसा होत आहे

Don`t copy text!