Home Breaking News चामोर्शी घोट रेगडी मार्गे छत्तीसगढ जाणाऱ्या रस्त्यात खड्डेच खड्डे…

चामोर्शी घोट रेगडी मार्गे छत्तीसगढ जाणाऱ्या रस्त्यात खड्डेच खड्डे…

159

प्रतिनिधी/ रेगडी
चामोर्शी घोट रेगडी कसनसुर ते पाखाणजूर छत्तीसगढ ला जुळणारा मार्ग सध्या खड्डेमय झाल्याचे दिसते
एकीकडे सध्या सरकार कडून महामंडळ चे तब्बल आठ हजार तीनशे नवीन बसेस घेण्या बद्दलचा करार झाल्याचा समजते
शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र एस टी महामंडळ ला तब्बल आठ हजार तीनशे बस देण्याचे सांगितले आहे
इकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्याची दूरध्वस्ता झाली आहे
गडचिरोली जिल्ह्यात तर रस्त्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की,सध्या सर्वच वाहन भंगार होत चालेल आहे
एकनाथ शिंदे यांच्या वायरल पोस्ट नंतर सध्या गाव खेड्यात सुद्धा याचा तीव्र निषेध करत आहेत
नागरिकांची अगोदर रस्ते सुरळीत करा त्या नंतरच तुम्ही नवीन बसेसच्या मागे निधी लावा असे सुद्धा बोलले जात आहे
नुकताच चामोर्शी तालुक्यातील श्यामनगर येथील व्यावसायिक प्रकाश रॉय यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हणाले अगोदर सरकारनि रस्त्याची दुरुस्ती करावी त्यानंतरच नवीन बसेस घेण्याची योजना आखावी असा रोखठोक वाक्य वापरले आहे
सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्गांची दूरध्वस्ता झाली आहे
चामोर्शी घोट रेगडी मार्गाने छत्तीसगढ राज्य जाण्याकरिता सर्वात जवळचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा रेगडी कसनसुर मार्ग सध्या खड्डेमय झाला आहे तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन या रस्त्याची नूतनीकरण करावी अशी मागणी परिसरात जोर धरत आहे

Don`t copy text!