Home Breaking News उभे धान पीक आडवे पडले शेतकरी अर्थिक संकटात…

उभे धान पीक आडवे पडले शेतकरी अर्थिक संकटात…

121

प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार भामरागड

अवकाळी पावसाने शेतकऱ्याचा स्वप्न धान घरी आणायचे भंगले
यावर्षी अतिवृष्टी मुळे आदी दोन वेळा पेरणी करावी लागली आणि आता अवकाळी आणि montha चक्रीवादळ मुळे उभे असलेले धान खाली पडले त्यामुळे यावर्षी धान्याची तुटवडा वाढणार
पीक घरी आणण्याचे स्वप्न भंगणार का
आज शेती ही तोट्याची होत चालली परंतु ग्रामीण भागातील नागरिकांना शेती शिवाय दुसरा पर्याय नाही आणि शेती हि अवकाळी पावसाने पूर्णतः उध्वस्त होत असल्याचे दिसत आहे काही वर्षा अगोदर बिनागुंडा भागात kosari शेती करायचे पण आता त्या भागातील नागरिक आता भात शेती कडे आले परंतु अवकाळी पावसामुळे त्याचे भात शेती चे नुकसान झाले आहे
मागील दिवसापासून दुपार नंतर पाऊस पडत आहे त्यामुळे ज्यांचे कापले धान आणि जे हलके धान कापण्यासाठी आले आहेत त्यांचे धान पावसामुळे घडून पडत असल्याचे दिसून येत आहे काल पासून चक्रीवादळ मुळे पूर्णतः धान पीक उध्वस्त झाले असून लवकर पंचनामे करावे आणि पूर्णपणे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे

Don`t copy text!