रात्रीच्या अंधारात जंगल तोडण्याचा गुन्हा पाइपलाइन खोदाई; झाडे उखडली, पर्यावरण रेटले आणि प्रशासन जाणूनबुजून शांत!
प्रतिनिधी रवींद्र सदमवार
भामरागड/बोटनफुंडी
28 ऑक्टोबर 2025
घनदाट वनक्षेत्रात मध्यरात्री गुप्तपणे पाइपलाइन खोदाईचे काम मोठ्या मशीन (JCB/Hitachi) द्वारे सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहण्यात आले. घटनास्थळी कोणतीही वनपरवानगी, पर्यावरणीय मंजुरी, सूचना फलक, अधिकारी उपस्थित नव्हते. झाडे मुळासकट उखडून मातीची धूप व नाल्यांचे नुकसान होत असून पूर्ण जंगलाचा छळ उघडपणे दिसत आहे.
ही कामे ग्रामसभा, PESA समिती आणि वनहक्क समितींच्या मंजुरीशिवाय नियमबाह्य व बेकायदेशीर ठरतात.
PESA कायद्यानुसार अनुसूचित गावातील नैसर्गिक संसाधनांवरील कोणत्याही निर्णयासाठी ग्रामसभेची स्पष्ट व खुलेरीतीने घेतलेली परवानगी अनिवार्य आहे. रात्री अंधारात परवानगीविना काम करून कायद्याचा सरळ अवमान केला जात आहे.
नागरिकांची ठाम व सार्वजनिक मागणी
बेकायदेशीर काम तात्काळ थांबविण्याचा आदेश
संपूर्ण प्रकरण ग्रामसभा, PESA समिती व वनहक्क समिती समोर खुली सभा घेऊनच निर्णय करणे अनिवार्य करावे परवानगीपत्रे व आदेशपत्रे सभेसमोर सादर करावी
झाडतोड व पर्यावरणहानीचा पंचनामा करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत ग्रामसभेच्या संमती शिवाय पुढील एकही काम करू नये काम बंद करावे जंगल, पाणी, जमीन आणि आदिवासी हक्क यावर केलेला हा रात्रीचा आघात हा फक्त गुन्हाच नाही तर ग्रामसभेवरील लोकशाही अधिकाराचा थेट अपमान आहे.
जंगलात मशीन चालू आहेत, पण प्रशासन गप्प ही शांतता म्हणजे मूकसंमती नाही तर संगनमत आहे, असा नागरिकांचा कडवा आरोप आहे.







