Home Breaking News हवामान खात्याचा अंदाज,पुढील तीन दिवस पाऊसाचे…

हवामान खात्याचा अंदाज,पुढील तीन दिवस पाऊसाचे…

230

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही वृत्तसेवा

हवामान खात्याने वर्तविलेल्या
अंदाजानुसार महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह विजांचे कडकडाट आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उद्या, मंगळवार २८ ऑक्टोंबर रोजी भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे , कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ इत्यादी जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करून वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर बुधवार २९ ऑक्टोंबर रोजी भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती,वाशिम, बुलढाणा इत्यादी जिल्ह्यांना यलो अलर्ट तर चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करत विजांच्या कडकडाटासह अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच गुरुवार ३० ऑक्टोंबर रोजी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, पालघर,धुळे, नंदुरबार, नाशि क, अमरावती इत्यादी जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Don`t copy text!