Home Breaking News अभिनेते सतीश शाह यांचा निधन…फिल्मी दुनियेत शोककळा…

अभिनेते सतीश शाह यांचा निधन…फिल्मी दुनियेत शोककळा…

151

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही वृत्त

आपल्या विनोदी अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारे सुप्रसिद्ध अभिनेते सतीश शाह आज काळाच्या पडद्याआड गेले. हम साथ, साथ हैं, में हूँ ना, कल हो ना हो, ओम शांती ओम यांसारख्या असंख्य चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम, दर्जेदार अभिनय साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

दूरदर्शनवरील साराभाई वर्सेस साराभाई मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका आजही सर्वाधिक संस्मरणीय कॉमिक रोल्सपैकी एक मानली जाते. त्यांच्या जाण्याने एक बहुगुणी कलाकार हरपल्याची भावना आहे. त्यांनी साकारलेल्या कलाकृती आणि अभिनय कायम प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहतील. सतीश शाह यांना टीम इंडिया दस्तक न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली!…

Don`t copy text!