वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कष्टाचा सन्मान करण्याची गरज…

66

प्रतिनिधी गौरव बुरांडे 
घोट:
पावसाळा असो की हिवाळा, भल्या पहाटे उठायचे. वर्तमान पत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे.. कोण सायकलने तर कोण्ही चालत चालत घरोघरी वर्तमान पोहचता करण्याचा नित्यक्रम पळणाऱ्या विक्रेत्यांचा सन्मान दिवस. त्यांच्या कष्टाचा गौरव करणारा अभिमानाचा दिवस त्यांचा सर्वजण त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्याची गरज आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस २०१८ पासून वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा होत आहे.माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम हे एक थोर शास्त्रज्ञ म्हणून सर्वत्र परिचित होते. त्यांनी बालपणी आपल्या कुटुंबियांना आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र वितरणाचेही काम केले होते.हे विशेष! वृत्तपत्र विक्रेत्यांचे आपल्या रोजच्या आयुष्यातही एक महत्वाचे स्थान आहे. आपण झोपेतून उठण्यापूर्वी, रोजच्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे पहाटेच आपल्या घरापर्यंत पोहचवण्याचे काम ही मंडळी अविरतपणे करत असतात. तेही पाऊस, थंडी, वारा, याची तमा न बाळगता. या र्विक्रेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांचा दृष्टीने हा कष्टाचा गौरव करणारा, अभिमानाचा दिवस असल्याच्या भावना आहेत. एखाद्या दिवशी आपले वृत्तपत्र जर आपल्याला मिळाले तर तर या कष्टकरी बंधावाला समजून घेऊ यात, हे वृत्तपत्र विक्रेता आणि वाटप करणारा केवळ कमिशन वर सेवा देत असतात, दर महिन्याला त्यांचे पैसे आपण वेळेवर देऊन त्यांच्या कष्टाचा सन्मान केला पाहिजे

वृतपत्र विक्रेत्याकडून बोलक्या प्रतिक्रिया जाणून घेऊ या
बॉक्स:- मी श्री स्वामी समर्थ न्युज पेपर ऐजसी द्वारा गेल्या कित्येक वर्षांपासून वृतपत्र विक्रेता म्हणून काम करीत असून माझ्या कडे वृतपत्र वाटप करणारे १० मुले काम करत असून ती मुले माझ्या परिवारातील सदस्य समजून काम करत असल्याने मला हा व्यवसाय करणे सोपे जात आहे त्या मुलांना योग्य कमिशन देत आहे तर मला वृत्तपत्र कंपनी कडून कमिशन मिळते त्यातून सर्व खर्च जाता जो नफा मिळत आहे. त्यात मी समाधानी असून वृत्तपत्र वितरणात अडचणी आल्या तरी वृतपत्र वाचकांनी आम्हाला सांभाळून सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे
ज्ञानेश्वर गोहने, ऐजंट व वितरक, श्री स्वामी समर्थ न्युज पेपर चामोर्शी
बॉक्स:- मी वृतपत्र ऐजंट व वितरकाचे काम बऱ्याच वर्षांपासून करीत असून ग्रामीण भागातील अनेक गावात चांमोर्शी वरून वृतपत्र गठ्ठे ताब्यात घेऊन स्वताच्या सायकलने गावोगावी फिरून अनेक अडचणीला तोंड देत वृतपत्रे घरोघरी वाटप करण्याचे काम अविरत सुरू आहे त्यातून जो नफा मिळत आहे तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी उपयोगी पडत आहे. त्यात मी समाधानी आहे .
प्रकाश घोगरे, वृतपत्र ऐजंट व वितरक , मूरखळा
बॉक्:- मी माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहा साठी गेल्या काही वर्षांपासून दिवसभर वृतपत्र वाटपाचे व वसूुलीचे काम करत आहे त्यातून मिळणारा कमिशन कुटुंबाच्या खर्चासाठी उपयोगी पडत असल्याने.मला वृतपत्र वाटप करणे माझ्यासाठी लाभदायक आहे
अखील बट्टे, वृत्तपत्र वितरक