आताची मोठी बातमी माओवादी भूपती ऊर्फ सोनू तब्बल 60 सहकाऱ्यांसह अखेर गडचिरोली पोलिसांसमोर भामरागड येथे शरण आला…

172

मुख्य संपादक इंडिया दस्तक न्यूज टीव्ही 

गडचिरोली : महाराष्ट्र- छत्तीसगड सीमावर्ती भागातील दंडकारण्यात गेली अनेक वर्षे माओवादी चळवळीचा चेहरा राहिलेला वरिष्ठ नेता मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू अखेर गडचिरोली पोलिसांसमोर भामरागड येथे शरण आला. तब्बल ६० सहकाऱ्यांसह त्याने आत्मसमर्पण केल्याची खळबळजनक माहिती १४ ऑक्टोबरला सकाळी समोर आली आहे. यासंदर्भात गडचिरोली पोलिसांनी अधिकृत माहिती दिली नाही, पण १६ ऑक्टोबरला मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शस्त्र खाली ठेऊन तो हाती संविधान घेणार असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले.
सविस्तर वृत्त लवकरच आपल्या पर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत