जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा जाहिर पाठिंबा…

63

मुख्य संपादक प्रशांत शाहा

NHAI यांना फेब्रुवारी- 2023 पासून वारंवार निवेदन देऊन ही दखल न घेतल्याने दि. 14/10/2025 पासून तहसील कार्यालय गेवराई येथे उपोषण करण्यात येत आहे.
1)बागपिंपळगाव येथील IRB कंपनीने अर्धवट सोडलेली कामे पूर्ण करावे.
2) बागपिंपळगाव ला स्मशानभूमी कडे जाण्यासाठी हायवे रस्ता ओलांडून जावे लागते, हायवेने जाणारी वाहने भरधाव वेगाने असतात रस्ता ओलांडताना अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवित हानी होऊ शकते, या साठी NHAI ने सर्वे करून पर्याय द्यावा.
3) गेवराई बायपास नायरा पेट्रोल पंपा समोर होत असलेले उड्डान पुलाचे काम चुकीचा सर्वे करून बांधकाम चालू आहे. ते काम थांबून, तेथील शेतकरी व गावकर्यांना अडचण होऊ नये अशा पद्धतीने नवीन सर्वे करावा.
4) गढी ते नवीन खामगाव NH 52 ला समांतर सर्व्हिस रोड पूर्ण करून जायकवाडी कॅम्प येथे कॅनॉल वर दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड करून त्यावर पूल बांधणे. त्याचा फायदा शेतकऱ्यां ऊस वाहतुकीसाठी तसेच विठ्ठल नगर(रेवकी-देवकी), आगरनांदूर, बेलगाव,नागझरी या गावाना होईल व विरुद्ध दिशेने होणारे जाणे-येणे थांबेल त्यामुळे अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी जाणार नाही.


या प्रमुख मागण्या साठी बागपिंपळगावचे सरपंच श्री रामेश्वर जगताप तसेच जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री संजय हाळनोर हे दि. 14/10/2025 पासून तहसील कार्यालय गेवराई येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. तरी त्यासाठी बागपिंपळगाव,विठ्ठलनगर (रेवकी-देवकी), आगरनांदूर, बेलगाव, नागझरी येथील ग्रामस्थांनी उपस्थळी हजर राहून पाठिंबा जाहिर पाठिंबा द्यावा हि विनंती .