शहरातील रस्ते दुरुस्ती व रुंदीकरणासाठी आज संयुक्तरीत्या विविध विभागांची घेतली बैठक – आमदार जोरगेवार…

205

सहसंपादक श्याम मशाखेत्री

चंद्रपूर:
शहरातील वाढता वाहतुकीचा ताण, पाणी गळती आणि रस्त्यांच्या कडेला उभे असलेले विजेचे खांब या समस्यांवर उपाय म्हणून आज शासकीय विश्रामगृह येथे महानगरपालिका, PWD, WCL आणि MSEDCL या विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. रस्ता रुंदीकरणातील अडचणी, खांब हटविणे आणि पाणी गळती दुरुस्तीबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार जोरगेवार यांनी दिल्या.

बैठकीनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी कस्तुरबा आणि महात्मा_गांधी मार्गाची पाहणी केली. सुमारे २० कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेले हे काम अंतिम टप्प्यात असून, रस्त्यावरील अतिरिक्त वीज खांब हटवून मार्ग दुरुस्ती व रुंद करण्याचे निर्देश दिले.यावेळी “केवळ रस्ते नव्हे, तर नागरिकांना सुरक्षित आणि सुखदायी प्रवासाचा अनुभव देणे हेच आपले ध्येय आहे,”असे आमदार जोरगेवार यांनी बोलत होते.