‘आय लव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मार्च चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या पुढाकारातून आयोजन…

57

सहसंपादक श्याम मशाखेत्री

चंद्रपूर : दलित समाजावर अन्याय, अत्याचार, हिंसेच्या घटनांत मागील काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. अशात आथा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार (ता. ८) दुपारी ४ वाजता चंद्रपुरात ‘आय लव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मार्चचे आयोजन करण्यात आले होते. गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मार्च काढण्यात आला.
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरून ‘आय लव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मार्चचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश अडूर यांच्या नेतृत्त्वात मार्च पार पडला. यावेळी गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मार्चला सुरवात झाली. यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, संविधनाने देश चालणार, अशा घोषणा दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मार्चची सांगता झाली.
आंदोलनात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेशजी(रामू)तिवारी,प्रदेश सरचिटणीस शिवा राव,महिला चंद्रपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चंदाताई वैरागडे, सुभाषसिंगजी गौर माजी नगरसेवक नंदू भाऊ नागरकर,प्रवीण पडवेकर,बापू अंसारी,रुचीत दवे,सचिन कत्याल मनीष तिवारी,अॅड. प्रीती शाह,शालिनी ताई भगत पप्पू सिद्दीकी, भालचंद्र दानव, पिंटू शिरवार,नौशाद शेख गौस खान,काशिफ अली, शिरीष गोगुलवार,प्राजेश वर्मा मनोज भैया इंटक नेते शबीर सिद्धिकी,प्रवीणकुमार अडूर,अभिलाषा वडलूरी,मोनू रामटेके, रोहित पिम्पलकर, अजय चिनुरवर,नागेश मामडीपेल्ली प्रेम पोयला,रघू रामगिरी मुन्ना अडूर प्रकाश देशब्रातर,स्वप्निल चिवंडे,मनीष दास,संतोष वर्मा,करण शर्मा,प्रदीप वर्मा मनीष यादव, हर्ष राजभर,विनीत डोंगरे,श्रीनिवास इडुनूरी,राजू अण्णा राजू इरगुरला,निखिल पुसाला,मनोज अडूर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.