आता फास्टटॅग नसेल तरी दुप्पट शुल्क मोजावे लागणार नाही…

127

काय आहे नवीन नियम जाणून घ्या

मुख्य संपादक प्रशांत शाहा

राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास
करणाऱ्या चारचाकी वाहन तसेच जड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा देत आता फास्टॅग नसेल किंवा तो काम करत नसेल तर दुप्पट भरावा लागणारा टोल कमी करण्यात आला आहे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून युपीआय (UPI) म्हणजेच ऑनलाईन पेमेंट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत टोलची रक्कम भरल्यास केवळ १.२५ पट टोल शुल्क भरावे लागेल. सदरचा नवा नियम हा येत्या, १५ नोव्हेंबर २०२५ पासून लागू करण्यात येणार आहे. पूर्वी फास्टॅग नसलेल्या वाहनांना टोल प्लाझावर दुप्पट टोल भरावा लागत होता. त्यातच फास्टॅग नसेल आणि नगदी रोख रक्कम देणार असाल तर दुप्पट रक्कम भरावी लागेल, पण तीच रक्कम युपीआय द्वारे करत असाल तर केवळ १.२५ पट रक्कम मोजावी लागेल. जसे की, एका सामान्य वाहनाची टोल टॅक्स २०० रुपये असेल तर फास्टॅग नुसार टोलवरती २०० रुपये भरावे लागणार. याच ठिकाणी रोख स्वरूपात टोल भरायचा असल्यास ४०० रुपये (दुप्पट) भरावे लागतील. पण, तीच रक्कम युपीआयच्या (UPI) माध्यमातून केली तर २५० रुपये भरावे लागतील. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या व फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.