नियुक्ती आदेश वितरण कार्यक्रम संपन्न…
सहसंपादक श्याम मशाखेत्री
अनुकंपतत्वावर नियुक्ती मिळविण्यास पात्र असलेल्या वर्ग-३ व वर्ग-४ तसेच महाराष्ट्र_लोकसेवा_आयोगामार्फत घेतलेल्या लिपीक-टंकलेखक परीक्षा-२०२३ अंतर्गत नियुक्तीप्राधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या उमेदवारांसाठी नियुक्ती आदेश वितरण कार्यक्रम चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री व पालकमंत्री, मा. प्रा. डॉ. श्री. अशोकजी_उईके साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यात एकूण १०,३०९ नियुक्त्या करण्यात आल्या असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २८५ अनुकंप धारकांना नियुक्ती प्रदान करण्यात आली.
मी या कार्यक्रमात उपस्थित होतो. आज मोठ्या प्रमाणावर युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले, ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी_फडणवीस साहेब आपण युवकांना दिलेल्या या भेटीबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! आणि नियुक्ती मिळालेल्या सर्व उमेदवारांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!







