चातगाव येथे गोपाल राईस मिलचे उद्घाटन मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते संपन्न…

188

प्रतिनिधी सतीश कुसराम

चातगाव, ता.धानोरा (दि. २ ऑक्टोबर २०२५):

दसरा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मौजा-चातगांव येथे “गोपाल राईस मिल – खावटी भरडाई धान्य दडण राईस मिल” चे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते फित कापून संपन्न झाले.

 

या प्रसंगी बोलताना डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, “चातगांव व आजूबाजूच्या परिसरात शेतकऱ्यांसाठी सुसज्ज राईस मिलची कमतरता होती. यापूर्वी शेतकऱ्यांना १५ ते २० किलोमीटर अंतरावरील मिलवर जावे लागत होते. मात्र आता चातगांवमध्येच आधुनिक राईस मिल उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार असून स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.”असे प्रतिपादन मा.खा.डॉ. नेते यांनी व्यक्त केले.

या सोहळ्यास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे, प्रदेश उपाध्यक्ष भारतजी खटी भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, राईस मिल संचालक चातगांव सरपंच गोपाल उईके, मानवाधिकार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष मनिषा मडावी, जगदीश मडावी, ग्रा.प.सदस्य राजू ठाकरे, दुमानेजी, सुधाकर मडावी, बारिक पेंदाम, मेश्राम टेलर, पदमगिरवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मानवाधिकार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. मनीषा मडावी भावूक होत म्हणाल्या की, “शेतकऱ्यांविषयी तळमळ असलेल्या माझ्या वडिलांचे हे स्वप्न होते. त्यांचे ते स्वप्न आज दसऱ्याच्या पवित्र दिवशी पूर्ण झाले याचा मला अतिशय आनंद आहे.”

या उद्घाटनामुळे चातगाव व परिसरातील शेतकऱ्यांना धान्य प्रक्रियेसाठी जवळच सुविधा उपलब्ध झाल्याने याचा फायदा निश्चितच होईल असे प्रतिपादन केले,