हिदेवाडा येथे ग्रामविकास आराखडा तयार – ग्रामसभेत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग…

42

प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार भामरागड

हिदेवाडा येथे ग्रामविकास आराखडा तयार – ग्रामसभेत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रधानमंत्री धरती आबा जनजाती उत्कर्ष व आदी कर्मयोगी अभियान अंतर्गत मौजा हिदेवाडा येथे मोठ्या उत्साहात ग्रामसभा घेऊन ग्रामविकास आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यात पुढील पाच वर्षांत गावात करण्यात येणाऱ्या विकासकामांचा सविस्तर समावेश करण्यात आला आहे.
ग्रामसभेला सरपंच रोशन वडे,पोलीस पाटील मनोहर सडमेक, ग्रामपंचायत सदस्य अरुणाताई वेलादी, निलाबाई तिम्मा, प्रतिष्ठित नागरिक बाजीराव वेलादी, झुरू बया, मुहंदा, बाबुराव सडमेक, मनोज तिमा, अरुण काळंगा, साईनाथ गव्हारे, पेसा मोबिलायझर जिजा सडमेक, गाव नोडल अधिकारी तथा ग्राम महसूल अधिकारी वृक्षभ हिचामी, ग्रामपंचायत अधिकारी अविनाश गोरे , सी एच ओ नंदिनी मडावी, अंगणवाडी सेविका विमल नैताम, आशा वर्कर छाया वेलादी, यांच्यासह ग्रामस्तरावरील सर्व कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आराखड्यातील प्रमुख कामे
शाळा व अंगणवाडींची देखभाल व दुरुस्ती
गावातील रस्ते व नाल्यांचे बांधकाम,सिंचन सुविधांचा विस्तार,पशुसंवर्धनासाठी उपक्रम,
घरकुल योजना,गोटूल बांधकाम
इतर सर्व आवश्यक विकासकामे
ग्रामसभेदरम्यान ग्रामस्थांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या गरजा व समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच गावात शिवार फेरी काढून कामांची वास्तवस्थितीची पाहणी करण्यात आली.
गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामविकास आराखडा राबविल्यास गावात शाश्वत विकास साध्य होईल, अशी आशा व्यक्त केली. हा आराखडा आगामी काळात गावातील सर्वांगीण प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.