मुख्य संपादक प्रशांत शाहा
चंद्रपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून एम.ए, (इंग्रजी,मराठी,राज्यशास्त्र इतिहास,व अर्थशास्त्र) या पाच विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून डी.एड तथा बी एड.एवढे शिक्षण घेत मिळविला महाविद्यालय शिक्षकाचा मान…
अंकलेश गणवीर हे मूल तालुक्यातील भेजगाव येथील रहिवासी आहेत
श्री अंकलेश गणवीर हे प्राथमिक शिक्षक म्हणून 08/04/2013 रोजी शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा बिजेपार जिल्हा गोंदिया येथे रुजू झाले.तदनंतर 01/07/ 19 ते 31/05/ 2025 या कालावधीत शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा रेगडी जिल्हा गडचिरोली येथे कार्यरत होते.त्यानंतर त्यांची नुकतीच पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणून भाकरोंडी येथे पदोन्नती झाली होती. परंतु TAIT/पवित्र पोर्टल 2022 अंतर्गत झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होवून त्यांना जिल्हा परिषद अमरावती येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे.
सध्या ते अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय वाढोणा रामनाथ तह.नांदगाव (खं) या ठिकाणी रुजू झालेले आहेत.