जिवती तालुका ओला दुष्काळ जाहीर करा’ किशोर चांदुरे यांचे प्रतिपादन…

126

प्रतिनिधी बळीराम काळे, जिवती

जिवती (ता.प्र.) :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिवती तालुक्याच्या वतीने आढावा बैठक पार पडली,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या वेळी किशोर चांदुरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,आगामी निवडणूकित काँग्रेस च्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व ताकतीने निवडणुकीला समोर जायचं आहे आणि दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती गण जिंकु, असा निश्चय करायचा आहे.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमाकुळ घातलेला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान
झाले आहे.
तरी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रशासनाने जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई तत्काळ द्यावी असे म्हणत,मागील बऱ्याच दिवसापासून संजय गांधी निराधारांचे पैसे त्यांच्या खात्यात येत नसल्याने निराधारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
प्रशासनाने लवकर निराधारंच्या खात्यात प्रती महिन्याला पैसे जमा करावे,या वेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे माजी तालुकाध्यक्ष गणपत आडे, माजी सभापती प्रा. सुग्रीव गोतावळे, व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते युवक कार्यकर्ते, अमोल कांबळे,नंदा मूसणे ताजुद्दीन शेख, भाऊ पाटील आत्राम अजगर भाई, घुले मामा, पांचाळ साहेब, मुनीर भाई, बाळू पतंगे, केशव भालेराव, प्रदीप काळे, डॉ बनसोड शंकर सोलंकर, शिवाजी करेवाड,महिला आघाडी व शेतकरी बांधवमोठ्या संख्येने उपस्थित होते.