“रक्त दान हेच श्रेष्ठ दान” चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न…

108

प्रतिनिधी गौरव बुरांडे

नेताजी सुभाषचंद्र बोस बंगाली सामाजिक संस्थेचे नोंदणीनंतरचे पहिलेचे सर्वस्वी रक्त दान शिबिर, सर्व सदस्यांनी रक्तदान केले,

चामोर्शी, २७ सप्टेंबर २०२५::- नेताजी सुभाषचंद्र बोस बंगाली सामाजिक संस्थेने २७ सप्टेंबर रोजी चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित केलेले रक्तदान शिबिर यशस्वी रित्या पार पडले. या रक्त दान शिबीरात ३० रक्तदात्यांनी यशस्वी रक्त दान केले. नेताजी सुभाषचंद्र बोस बंगाली सामाजिक संस्था नोंदणीनंतरचे हे पहिलेच शिबिर होते.

प्रमुखस्थान ग्रामीण रुग्णालय चामोर्शीतील वैद्यकीय अधिकारी डॉ.दिपान्नती देवरी, यांच्या सह शीबिरात सर्व सदस्यांनी उत्साहाने रक्तदान केले.

संस्थेचे अध्यक्ष श्री. रणेन मंडल, उपाध्यक्ष डॉ. बिधान देउरी, सचिव श्री. सुरेश शहा, सहसचिव डॉ. अचिंत बिस्वास आणि कोषाध्यक्ष श्री. सुजित मजुमदार यांच्या अथक प्रयत्नांमुळे कार्यक्रम विशेष यशस्वी झाला.

रक्त दान शिबीरात रक्तदात्यांना प्रोत्साहन देन्या करीता माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, निखिल भारत बंगाली समन्वय राष्ट्रीय उपध्याक्ष डॉ.विधान ब्यापारी, प. सं माजी सदस्य श्री. विष्णु ढाली, डॉ. कमलेश गाईन, (एस. एस. आर (नौसेना) श्री कुणाल गाईन, शिबाराचे आयोजक नेताजी संस्थाचे अध्यक्ष तथा निखील भारत बंगाली समन्वय जिल्हा सचिव, अध्यक्ष शिवशेना बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष श्री रनेन रमेंद्र मंडल, संस्थाचे सचिव तथा नि.भा. बंगाली सन्मवय समितिचे तथा बिजेपी बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रदेश सचिव श्री सुरेश शाहा, उपाध्यक्ष डॉ.विधान देवरी, सहसचिव अचिंत बिस्वास, कोषअध्यक्ष सुजित मजूमदार, कार्यकारी अध्यक्ष डॉ.देवाशिष दास, सदस्य म्हणून विक्की कर्मकार, तरुण खा, अजित माझी, राजू मंडल, तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.

चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. किलनाके सर, डॉ . तलमले सर आणि ग्रामीण रुग्णालय चामोर्शीतील कर्मचाऱ्यांनी शिबिराला महत्त्वपूर्ण सहकार्य केले. नेताजी सुभाषचंद्र बोस बंगाली सामाजिक संस्थेने सर्व रक्तदात्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे मनापासून आभार मानले.

प्राध्यापक बिधान बेपारी यांनी सादर केलेल्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.