एकच कंपनीला ५०० कोटींचे कामे दिली ती प्रक्रिया रद्द करून नव्याने प्रक्रिया करा!अन्यथा अधीक्षक अभियंता कार्यालयाला ताला ठोकणार!…

116

प्रतिनिधी सतीश कुसराम

सुरेंद्रसिंग चंदेल माजी जिल्हाप्रमुख शिवसेना शिंदे (गट) जिल्हा गडचिरोली

दिनांक 27 सप्टेंबर 2025
गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागा कडून पाचशे कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा नुकताच काढण्यात आल्या होत्या त्यात जिल्ह्याच्या स्थानिक कंत्राटदारांनी मोठया प्रमाणात सहभाग घेण्यास गेले असता त्यांना डावलण्याचा प्रयत्न झाला. परंतु जिल्ह्याच्या कंत्राटदारांनी आरडाओरड केल्या नंतर त्यांची निविदा घेण्यात आली परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला एकाच कंपनीला काम द्यायचे असल्याने पूर्ण नियम धाब्यावर बसवून प्रक्रियेत अनियमिता करून एकाच कंपनीला १० टक्के अधिक दराने कामे देण्यात आली जिल्ह्यात अनेक कंत्राटदार कामे घेण्यास पात्र असताना त्यांना डावलण्यात आले याच जिल्ह्यातील कंत्राटदाराने एका काळात नक्षलग्रस्त भागात आपल्या स्वतःचा नुकसान करून आपल्या जीवाची पर्वा न करता नक्षलग्रस्त भागातील कामे पूर्ण करून शासनाला मदत केली आहे पाचशे ते हजार कोटी रुपयाची कामे घेण्यास पात्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कंत्राटदारास अपात्र ठरविण्यात आले आपल्या जिल्ह्यातील कंत्राटदारावर एक प्रकारचा हा अन्याय आहे १० टक्के जादा दराने एकाच कंत्राटदाराला काम देऊन शासनाचा फार मोठा राज्य शासनाचा 150 कोटी रुपयांचा शुद्ध नुकसान होत आहे या बाबतचे निवेदन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रणय खुणे आणि दक्षिण दंडकारण्य कंत्राटदार संघटना जिल्हा गडचिरोली कंत्रटदारानी माजी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या कडे निवेदन द्वारे केली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने ही निविदा प्रक्रिया येत्या १५ दिवसात रद्द करावी अन्यथा शिवसेना ( शिंदे गट) च्या वतीने अधीक्षक अभियंता बांधकाम विभाग यांना घेराव करून कार्यालयाला टाळा ठोकण्यात येईल असा स्पष्ट इशारा माजी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी इशारा दिला आहे,