गडचिरोलीत जिल्हास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न…

47

प्रतिनिधी गौरव बुरांडे
माजी खासदार डॉ. अशोकजी नेते *आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा शुभारंभ

आमदार डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा योगिता पीपरे यांची विशेष उपस्थिती

गडचिरोली (दि. २७ सप्टेंबर २०२५) :
माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने “Grand Launch of Namo Yuva Run 2025 – For a Nasha Mukt Bharat” या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

ही स्पर्धा आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथून सुरू होऊन शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्स येथे यशस्वीरीत्या पार पडली.

या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मान. डॉ. अशोकजी नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनची सुरवात करण्यात आली. तसेच स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
यावेळी विविध गटांतील विजेत्यां स्पर्धकांना पुरस्कार वितरित करण्यात आले यामध्ये:

खुला गट – मुली : रुचिका सुतीन नागरकर, लावण्या सुभाष नागरकर, मंदा तुकलवार

खुला गट मुले : रोषण बोदलकर, सौरभ कन्नाके, निखिल टेंभुर्णे

वयोगट 14 ते 18 मुली : वृंदा भुरसे, संध्या नरोटे, अश्विनी खेडेकर, गिताजंली चौधरी

वयोगट 14 ते 28 मुले : विवेक भगत, विवेक भोयर, हर्षल सुरकर

जेष्ठ नागरिक : ज्ञानेश्वर दुर्गे, शामराव सुरजागडे

तसेच मॅरेथॉन मध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धाकांना प्रमाणपत्र देण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील शेकडो युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. “नशामुक्त भारत” या घोषवाक्याला प्रत्यक्ष कृतीतून बळकटी देत या उपक्रमाने गडचिरोली जिल्ह्यातील तरुणाईत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

या भव्य उपक्रमावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, कि.मो.प्र. सचिन रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री गिताताई हिंगे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. नितिन कोडवते, भाजपा नेत्या डॉ. चंदाताई कोडवते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा योगिता पिपरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुकाध्यक्ष दतु सुत्रपवार, डॉ. भारत खटी, अनिल पोहनकर, भाजयुमो महामंत्री आकाश सातपुते, हर्षल गेडाम, साई सिल्लेवार, देवाजी लाटकर, सीमा कन्नमवार, पुष्पा करकाडे, केशव निंबोड, दतु माकोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मॅरेथॉन स्पर्धेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील युवकांमध्ये आरोग्य, फिटनेस आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित झाले.