जिवती तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावे…

138

जिवती तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावे…
याकरिता तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन’

बळीराम काळे, जिवती

जिवती (ता.प्र.) : सतत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला तसेच फळबागांची उभी पिके वाहून गेली असून नदी–नाल्यालगतची शेती खरवळून गेल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. शेतात पाणी साचल्यामुळे कापसाची बोंडे कुजली असून शेतकरी हवालदिल झाला आहे अशीच परिस्थिती राहील व सरकारकडून कुठलेही आर्थिक नुकसान भरपाई मिळाली नाही तर अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते त्यामुळेच त्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता
तालुका काँग्रेस कमिटीचे नेते, पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारामार्फत निवेदन सादर करून, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
माजी सभापती सुग्रीव गोतावळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. अवकाळी पावसामुळे शेती करण्यायोग्य जमीनही उद्ध्वस्त झालेली असल्याने त्वरित मदत न मिळाल्यास शेतकरी मोठ्या संकटात सापडतील.
या मागणीस पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, भगवान डुकरे, केशव भालेराव, जब्बार भाई शेख, न्यानेशवर पवार, सुरेश कोडापे, कंटू कोटनाके, मधुकर काटे, आनंद मडावी,तुकाराम मोरे, जयतू कुलमेथे, गोविंद दुबले, नितेश ढगे, प्रभू बसवंते, मारोती राठोड, दयाराम दुबले, माधव राठोड, गणेश वाघमारे,पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.