अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी तहसीलदार ते उप विभागीय अधिकारी ते
अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात तब्बल तीन दंडाचा आदेश पारित
वरोरा शहर प्रतिनिधी संकेत कायरकर
वरोरा:-
तालुक्याच्या डोंगरगाव येथील रेल्वेच्या तिसऱ्या लाईन चे काम सुरू असतांना रेल्वे ठेकेदार यांनी बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात गौण खनीज उत्खनन करण्यात आले होते, दरम्यान या प्रकरणी चे कामगार नेते छोटू भाई शेख यांनी तहसीलदार यांचे कडे तक्रार केली होती व तहसीलदार यांनी रेल्वे कंत्राटदार यांचेवर दंड आकारणी केली होती, त्या आदेशाच्या विरोधात कंपनी उपविभागीय अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे अपील मध्ये गेले परंतु अप्पर जिल्हाधिकारी यांनी रेल्वे अधिकारी व ठेकेदार विरोधातअवैध उत्खनन प्रकरणी
1 कोटी 61लाख 55 हजार दंडाचे पुन्हा आदेश पारित केल्याने छोटू भाई शेख यांच्या लढ्याला तिसऱ्यांदा मोठे यश मिळाले आहे,
रेल्वे अधिकारी व ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही झाल्यानंतर विभागीय आयुक्त व उच्च न्यायालय नागपूर यांच्याकडे अपील मध्ये जाऊ नये यासाठी छोटूभाई यांनी तिथे कॅव्हेट अर्ज दाखल केला आहे त्यामुळे आता रेल्वे अधिकारी आणि त्यांचे कंत्राटदार यांना शासनाचा बुडविलेला महसूल सरकार जमा करावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे, त्यातही जर रेल्वे कंपनी कंत्राटदार जर कंपनी कार्यवाही करिता सर्वोच्च न्यायालय पर्यंत धाव घेणार तर तिथेही आम्हीच जिंकू असा विश्वास छोटूभाई शेख यांनी व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकरण?
अवैध गौण खनीज प्रकरणी दि 13 जानेवारी 2025 उपविभागीय अधिकारी यांच्या आदेश कायम ठेवून अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांनी महसूल अधिनियम 1966 कलम 247 प्रमाणे रेल्वे अधिकारी व ठेकेदार विरुद्ध अपील आदेश केले असून यामध्ये वाहन व उत्खनन चे एकूण 1 कोटी 61 लाख 55 हजार रुपये दंडाचा आदेश केल्याने शेख जैरुदीन छोटू भाई यांनी न्याय मिळाल्याबद्दल अपर जिल्हाधिकारी यांचे आभार मानले आहे.