शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लाहेरी यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी चव्हाण यांना दिले निवेदन…

116

प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार
लाहेरी:
शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा लाहेरी येथे फक्त दोन उच्च् माध्यमिक शिक्षक व एक मुख्याध्यापक असून येथील विदयार्थी पटसंख्या 308 आहेत आणि सत्र 2025-26 या सत्राच्या सुरवातीपासून शाळेत प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, व उच्च माध्यमिक शिक्षकांचे अनेक पदे रिक्त अल्याने विदयार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे तरी आम्ही शाळा व्यवस्थापन समिती टोकाचा निर्णय घेउन दिनांक 27/09/2025 ला शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करणार आहोत जर आपण सात दिवसापर्यंत पूर्ण शिक्षक पद भरणार नसल्यास तालुक्यातील तीन आश्रमशाळेच पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती मिळून भामरागड येथे असलेल्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाला कुलूप ठोकू असा इशारा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी यांनी दिला आहे.

आम्हच्या पाल्यांना शिक्षण देत नसाल तर विविध योजना आम्हच्या कोणत्या कामाचे नाही
लक्ष्मीकांत बोगामी लाहेरी.