सहसंपादक श्याम मशाखेत्री
जुगार अड्या वर कार्यवाहीची मागणी
राजुरा विधानसभेतील महाराष्ट्रातील सिमावर्ती भागात रम्मीच्या नावाखाली तिन पत्ते, कटपत्ता सुरु असल्यामुळे त्या भागातील शेतकरी बांधव जुगारामुळे देशोधळीला लागत असल्यामुळे या सर्व जुगार अड्यावर कार्यवाही करुन कायस्वरुपी बंद करण्याबाबत.
राजुरा विधानसभेतील तालुके हे तेलंगणा सिमेलगत असल्याने तेलंगाण्यातील काही अट्टल जुवारी महाराष्ट्रातील काही जुगाऱ्याना हाताशी धरून राजुरा विधानसभेतील राजुरा तालुका सोनुर्ली, जिवती तालुका पाटन बोरी, गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा कोरपना तालुका गडचंदूर या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा चालू असून या सर्व जुगार अड्यावर दररोज १०० ते २०० फोरव्हिलर गाड्या घेवून जुगार खेळायला येत असल्याने या सिमावर्ती भागातील लोकांना याचा त्रास होत आहे या ठिकाणी अवैध दारु, बकऱ्याचे जेवण देण्यात येत आहे. या ठिकाणी अनेकदा लिन पत्ते कट पत्ता यामधून अनेकदा जुगार खेळणाऱ्यामध्ये वाद झालेला आहे एकमेकांना मारण्याचे प्रकार सुद्धा झालेले असल्याने त्या ठिकाणी कोणत्याही क्षणी वाद होऊन जिवीत हानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तसेच सामाजिक व्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याने आपणास विनंती आहे की, या जुगार अड्यामुळे स्थानिक लोकांवर सुद्धा परिणाम होत असल्यामुळे त्यांचे आर्थिक सामाजिक नुकसान होत असल्याने या जुगार अड्यावर ताबडतोब कार्यवाही करुन जुगार चालविणाऱ्यावर कारवाई करावी याचे निवेदन देण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचकडे सुधा तक्रार करण्यात आली







