ओबीसी समाजाचे आरक्षण वाचविण्यासाठी रस्त्यावरची लढाई निकराने लढू…

133

प्रतिनिधी श्याम मशाखेत्री

चंद्रपूर येथे १० ऑक्टोबर रोजी नागपुरात होणाऱ्या सकल ओबीसी महामोर्चा संदर्भात नियोजन बैठक शेकडो समाज बांधवांच्या उपस्थित पार पडली.

आज आपण अस्तित्वासाठी, हक्क, अधिकार आणि न्यायासाठी लढत आहोत. पण ही वेळ आपल्यावर कोणामुळे आली याचाही विचार करणे आवश्यक आहे, एका बाजूला सरकार म्हणते आमचा DNA ओबीसी आहे मात्र दुसऱ्या बाजूला ते कृतीत दिसते का हा खरा प्रश्न आहे. सरकारच्या एका GR हे मुळे आपले अस्तित्वचं धोक्यात आले आहे. भविष्य उध्वस्त झालं आहे.

आज ओबीसी समाजाला खाईत लोटण्याचे काम सरकारने केले. आपल्या हिश्श्याच्या आरक्षणात पहेलवानांना सोयीचा प्रवेश देऊन, तसा GR काढून ओबीसींचा विश्वासघात केला गेला. त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतरून निकराने ही लढाई लढावी लागणार आहे.

कदाचित कालांतराने राजकारणातून माझं नाव मिटेल, पण ओबीसी आरक्षण वाचवण्याच्या लढाईत ते निरंतर राहील असा मला विश्वास आहे. या बैठकाच्या माध्यमातून समाजात जनजागृती होत असून समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत आहे.

बैठकीनंतर जिल्ह्यातील विदर्भ तेली समाज महासंघ, संत गाडगेबाबा धोबी, वरठी समाज, मुस्लिम ओबीसी (पिंजारा) समाज, म्याटमज सुतार समाज, विश्वब्राह्मण पांचाळ समाज, लोहार समाज, माळी समाज, बेलदार समाज, वंचित बहुजन आघाडी, कुणबी समाज, ओबीसी सेवा संघ, नाभिक समाज, बारी समाज, शिंपी समाज, सोनार समाज, भोई समाज मंडळाच्या प्रतिनिधीनी उपस्थित राहून सकल ओबीसी महामोर्चाला जाहीर पाठींबा दिला.